प्रसिद्ध अभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकरने ‘पुणे टू गोवा’ या हिंदी चित्रपटासाठी नुकतेच पार्श्वगायन केले असून, सारी कसर दिल की तुझपे निकाल दु! मे रात भर तुझे प्यार दू असे गीताचे बोल आहेत. या गीताला संगीतबद्ध सन्मित वाघमारे यांनी केले आहे, तर गीताचे बोल गीतकार रॅपर ब्रोज यांचे आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक अमोल भगत हे आहेत. केतकी माटेगावकरने विविध भाषांमध्ये पार्श्वगायन केले आहे. ‘पुणे टू गोवा’ या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन करताना गीताचे बोल व संगीत भाराहून टाकणारे आहे. या गीताचे बोल लयबद्ध असल्याने गीत गाताना खूप छान वाटले असे केतकीने सांगितले,
तर या गीताला केतकी माटेगावकर व हिंदीतील प्रसिद्ध गायक शाहिद मल्या यांचा आवाज लाभलेला आहे. ‘पुणे टू गोवा’ हा चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. हिंदीतील मल्टिस्टार कास्ट या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.