मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे ही सोशल मीडियातील पोस्टमुळे सतत वाद आणि चर्चेत येत असते. केतकी चितळे हिने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबत अतिशय खालच्या भाषेत लिहिले आहे. यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून तिच्यावर सडकून टीका केली जात आहे. केतकीच्या विखारी टीकेवर खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली.
नवनीत राणा यांनी टीका कऱणाऱ्या केतकी चितळेला शरद पवारांची माफी मागावी, असं आवाहन केलं. नवनीत राणा यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला.
#केतकीचितळे नी @PawarSpeaks यांच्या बद्दल ज्या मेसेजचा प्रसार केला तो अतिशय चुकीचा आहे. #Sharadpawar यांनी महाराष्ट्रासाठी ५० वर्ष राजकीय संघर्ष केला त्यामुळे #केतकी_चितळे ने #शरदपवार यांची माफी मागावी व आम्ही या गोष्टीचा निषेध करत असल्याचं @navneetravirana यांनी म्हटलं आहे. pic.twitter.com/HBbGQNPGJH
— Akshay Mawale (@AkshayMawale11) May 14, 2022
व्हिडीओमध्ये नवनीत राणा म्हणाल्या की, केतकी चितळेने शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीजियावर केलेली पोस्ट अतिशय चुकीचा आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी ५० वर्ष राजकीय संघर्ष केला. त्यामुळे केतकी चितळेने शरद पवार यांची माफी मागावी. आम्ही केतकीच्या कृतीचा निषेध करत असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.