केतकी चितळेला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्या चार जणांना अटक

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे विरोधात अश्लील कमेंट करणाऱ्या आणखी चार जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी औरंगाबदमध्ये जाऊन याआधी एकाला अटक केली होती. त्यानंतर आता याप्रकरणी आणखी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.

काही दिवसांपूर्वी, केतकीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर आपले फॅन्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेतील असल्यानं सर्वांना समजेल अशा हिंदी भाषेत व्हिडीओ करण्याची वाजवी भूमिका मांडली होती. मात्र केतकीने आपली मातृभाषा सोडून हिंदीतून व्हिडीओ काढण्याची घेतलेली भूमिका काहींना अजिबात रुचली नाही. केतकीच्या या भूमिकेचा सोशल मीडियावर विरोध देखील होऊ लागला. ट्रोलर्सने सवयीप्रमाणे ‘बिलो द बेल्ट’ किंवा कंबरेखालील कमेंट्‌स द्यायला सुरुवात केली खरी परंतु ट्रोलर्सच्या कमेंट्‌सना इतरांप्रमाणे इग्नोर न करता केतकीने यावर ठाम भूमिका घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.