मुंबई – मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री ‘केतकी चितळे’ ही तिच्या अभिनयापेक्षा वेगळ्याच कारणाने नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. केतकीच्या काही अशाही पोस्ट आहेत ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल देखील केले आहे. आता पुन्हा एकदा तिने आपल्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये केतकीने तिच्या स्टाइलने सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने आपल्या अधिकृत सोशल मीडिया आकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे.
मात्र, आता केतकीचे ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून, अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात देखील केली आहे. यावेळी केतकीने पुण्यात जाऊन थेट पुणेकरांचीच फिरकी घेतली आहे. हिंदू नववर्षाच्या पुणेकरांनी इंग्रजीतून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे पुण्यातील लोकांना स्वघोषित मावळे म्हणत अभिनेत्री केतकी चितळेनं त्यांचे कान टोचले आहेत.
View this post on Instagram
आपल्या व्हिडिओत केतकी म्हणते की, “नमस्कार मी केतकी चितळे, आता मी आहे पुण्यात.. म्हणजेच स्वघोषित मावळ्यांच्या जन्मभूमीत.. रस्त्यावर चालताना मला बऱ्याच ठिकाणी ‘हॅप्पी गुढी पाडवा’ असे पोस्टर दिसले. त्यामुळे मला या सगळ्या मावळ्यांना विचारायचं आहे की, आता तुम्ही विसरलात का महाराजांना,
त्यांच्या शिकवणीला.. की फक्त दादागिरी करताना महाराजांचे नाव वापरुन त्यांचा अपमान करता.. आजही नवीन वर्षांच्या हॅप्पी गुढी पाडवा अशा शुभेच्छा देताना तुम्हाला काहीच वाटत नाही का.. असो.. गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..’ असं अभिनेत्री म्हणाली आहे. तिच्या या व्हिडिओवर अनेकांनी आता कमेंटचा वर्षाव करत आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.