Ketaki Chitale Post – मराठी सिनेमासृष्टीतील अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या अभिनयापेक्षा वेगळ्याच कारणाने नेहमी चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील काही पोस्ट अनेकवेळा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. केतकीच्या काही अशाही पोस्ट आहेत ज्यामुळे तिला नेटकऱ्यांनी मोठ्या ट्रोल देखील केले आहे. आता पुन्हा एकदा तिने आपल्या सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती लोकांना सणांच्या शुभेच्छा कशा प्रकारे द्याव्यात याचे ज्ञान सांगत आहे. याच कारणावरून नेटकऱ्यांनी आता केतकीला ट्रॉल करण्यास सुरुवात केली आहे.
भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही दणका देणार?
केतकीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने आपण सणांच्या शुभेच्छा देताना जे इमोजी आणि ‘happy’ हा शब्द वापरतो त्यावरच आक्षेप घेतला आहे. आपण शुभेच्छा देताना जे इमोजी वापरतो ते इमोजो चीनमध्ये त्यांच्या नववर्षासाठी वापरला जातो, असे केतकीचे म्हणणे आहे. यांनतर दुसऱ्या पोस्टमध्ये तिने म्हटले की, प्रत्येक सणाच्या वेळी हॅपी या शब्दाचा वापर करून धर्माची माती करू नका. आपण जेव्हा हॅप्पी लिहितो तेव्हा हॅप्पी आणि शुभेच्छा या दोन शब्दांमध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळे ते आपण समजून घेतले पाहिजे. अशा गोष्टी करून तुम्ही आणि तुमच्या धर्मामध्ये अंतर करू नका, असेही केतकीचे म्हणणे आहे.
केतकी चितळे अनेकवेळा तिच्या फेसबुक पोस्टमुळे वादात सापडली आहे. काही महिन्यापूर्वी तिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आजारावर टीका करताना अत्यंत वादग्रस्त भाषेचा वापर केला होता. त्यानंतर केतकीवर गुन्हा दाखल झाला व तिला जेल मध्येही जावे लागले होते. एव्हढे सगळे होऊनही तिने आपला पोस्ट करण्याचा अंदाज बदलेला नाही. त्यामुळेच आता पुन्हा एकदा ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.