मुंबई – गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात दसरा मेळाव्याचा वाद चांगलाच पेटला आहे. त्यासाठी शिवसेनेने तर चक्क न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र या सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे यंदा शिवतीर्थवर म्हणजेच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा होणार नाही कारण. यंदा मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला परवानगी नाकारली आहे.
यावर आता भाजप नेते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट केले आहे की,’एक नेता एक मैदान हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठीक होते. आता ना बाळासाहेब ना शिवसैनिक तर मैदान कशाला हवे? घरात बसून फेसबुक लाईव्ह होतंय की! मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष तेवढच तर केल’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
पहा ट्विटः
एक नेता एक मैदान हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत ठीक होते. आता ना बाळासाहेब ना शिवसैनिक तर मैदान कशाला हवे? घरात बसून फेसबुक लाईव्ह होतंय की! मुख्यमंत्रीपदी अडीच वर्ष तेवढच तर केल
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 22, 2022