वाघोली – केसनंद-राहू रस्त्याची काळे ओढा ठिकाणी दुरुस्ती अंतिम टप्प्यात आली आहे. कामाबाबत नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात असून याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जास्तीत जास्त लक्ष देण्याची मागणी माजी उपसरपंच कैलास सातव पाटील यांनी केली आहे.
वाघोली केसनंद-राहू रस्त्याला पावसामुळे काळे ओढा या ठिकाणी मोठया प्रमाणात खड्डे पडले होते. नागरिकांकडून या रस्त्याची दुरुस्ती तातडीने होण्याबाबत मागणी होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने या ठिकाणी तातडीने सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे.
हे काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा रस्ता नागरिकांसाठी पूर्ववत करण्यात येणार असल्याचे माजी उपसरपंच कैलास सातव पाटील यांनी सांगितले. याशिवाय याच रस्त्याला लागून इतर ठिकाणी तातडीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी सातव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.