कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची बातमी ताजी असताना आता आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 26 वर्षीय अभिनेत्रीचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कोची भागात राहणारी ट्रान्सवुमन मॉडेल तिच्या भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आली. गेल्या अनेक दिवसांपासून अनेक अभिनेत्रींच्या मृत्यूंमुळे मनोरंजन क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मल्याळी अभिनेत्री शेरीन सेलिन मॅथ्यू तिच्या मित्रासोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होती. दरम्यान 26 वर्षीय अभिनेत्रीने व्हिडिओ कॉलवर बोलत असतानाच पंख्याला गळफास घेतला. ती ज्या व्यक्तीसोबत व्हिडिओ चॅट करत होती त्या व्यक्तीने पोलिस अधिकाऱ्यांना शेरीनच्या हालचाली बघताच माहिती दिली. मात्र पोलिस अधिकाऱ्यांना अभिनेत्रीला वाचवण्यात यश आले नाही, पोलिस घरी पोहोचेपर्यंत शेरीनने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेने मनोरंजन क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
शेरीन डिप्रेशनची शिकार होती. गेल्या काही दिवसांपासून ती खूप उदास वाटत असल्याची माहिती तिच्या जवळच्या नातेवाईकांनी पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलीसांनी अभिनेत्रीच्या जवळच्या मित्रांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. शेरीनने काही मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि मॉडेलिंगच्या जगात ती खूप सक्रिय होती.