केरळ – कोच्चीमध्ये समुद्र किनाऱ्या जवळील अनधिकृत बांधलेल्या दोन लग्जरी अपार्टमेंटचे १५० फ्लैट्स पाडण्यात आले. काही क्षणातच मोठ्या धमाक्याच्या आवाजात हि 18 मजली इमारत जमीनदोस्त झाली. या अनधिकृत इमारत जमीनदोस्त झाल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
#WATCH Maradu flats demolition: H2O Holy Faith apartment tower demolished through controlled implosion #Kerala pic.twitter.com/fKbciLGH14
— ANI (@ANI) January 11, 2020
दरम्यान स्थानिक अधिकारींनी दिलेल्या महितीनुसार, येथील अनधिकृत इमारती जमीनदोस्त करण्याचे काम आज आणि उद्या चालणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने आज सकाळी 11 वाजता या इमारती पाडण्याचे काम हाती घेतले आहे.
आज सकाळी येथील ( H2O ) हॉली फेथ अपार्टमेंट टॉवर स्फोटकं लावून पाडण्यात आले. मदुराईमधील अनधिकृच इमारतींमध्ये ( H2O ) हॉली फेथ, ( twin towers of Alfa Serene ) जैन कोरल कोव आणि गोल्डन कायालोरमचा समावेश आहे. शनिवारी आणि रविवारी या इमारती जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.