कोची – बॉलिवुडची अभिनेत्री सनी लिओन आणि तिच्या अन्य दोन सहकाऱ्यांवर एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तिला अटकेपासून संरक्षण देण्याचा निर्णय केरळ हायकोर्टाने दिला आहे.
सनीने या कंपनीच्या एका कार्यक्रमाला येण्यासाठी 29 लाख रूपयांची रक्कम घेतली होती पण ती या कार्यक्रमाल आलीच नाही. त्यामुळे तिच्या विरोधात हा फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
या प्रकरणात तिच्या खेरीज करेनजीत कौर व्होरा, आणि सनीचा नवरा डॅनिएल वेबर हे दोन आरोपी आहेत. यातील फिर्यादीला सीआरपीसी 31 अन्वये रितसर नोटीसा जारी केल्या गेल्या जाण्याची गरज आहे. तो पर्यंत त्यांना अटक करू नये असे कोर्टाने म्हटले आहे. सनी आणि तिच्या या दोन साथीदारांनी केरळ हायकोर्टात अटकपुर्व जामीनासाठी अर्ज केला आहे.
या प्रकरणात सनीची कोची क्राईम ब्रॅंचच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आहे, पोलिस चौकशी झाल्यानंतरच आपल्या विरोधात असा काहीं गुन्हा नोंदवला गेला आहे याची आपल्याला माहिती मिळाली असा तिचा दावा आहे.
या प्रकरणात आपण पोलिसांना आपली बाजू समजावून सांगितली असून त्यांना या संबंधातील कागदपत्रेही दाखवली आहेत असे तिचे म्हणणे आहे. या शो साठी जी रक्कम ठरली होती त्यातील बारा लाख रूपये संबंधीत कंपनीने न दिल्याने आपण हा कार्यक्रम केला नव्हता असे तिचे म्हणणे आहे.