श्रीगोंद्याच्या ‘टीम’ची केरळात वैद्यकीय सेवा 

कोचीन (केरळ) : येथील कॅम्पमध्ये वैद्यकीय मदत करताना श्रीगोंद्यातील डॉक्‍टर.

श्रीगोंदा – केरळ राज्यात पुराच्या नैसर्गिक आपत्तीने शेकडो कुटुंब बेघर झाले तर कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला. पुरामुळे साथीचे व इतर आजार वाढल्याने वैद्यकीय सेवेची मोठी गरज निर्माण झाली होती. तालुक्‍यातील डॉ. राजेश पाखरे व त्यांच्या तीन सहकाऱ्यांनी पूररग्रस्तांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी थेट केरळ गाठले.

केरळ राज्यात पुरामुळे शेकडो लोकांना प्राण गमवावे लागले. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी केरळ राज्याला देशासह जगभरातून निरनिराळ्या प्रकारे मदतीचा ओघ सुरू झाला. केरळमध्ये पुरामुळे शेकडो लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. मात्र या आपत्तीत वैद्यकीय सेवेचीदेखील मोठी गरज निर्माण झाली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तालुक्‍यातील श्रीगोंदा फॅक्‍टरी येथील डॉ. राजेश पाखरे यांनी श्रीगोंद्यातील विठ्ठल सोनवणे, सूरज गायकवाड आणि हिरडगाव येथील अमोल चव्हाण यांना बरोबर घेऊन थेट केरळ गाठले. स्वयंस्फूर्तीने निघालेल्या या “टीम’ला श्रीगोंदा फॅक्‍टरी येथील श्रीनिवास मेडिकल, जाई मेडीकल आणि दत्त मेडीकलच्या चालकांनी औषधे दिली. 24 ऑगस्ट रोजी ही चार लोकांची टीम केरळमधील कोचीन जिल्ह्यातील परहुर तालुक्‍यात गेली. मात्र तेथे पोहचल्यावर स्थानिक भाषा येत नसल्याने स्थानिकांशी संवाद साधण्यात अडचण निर्माण झाली.

अखेर या “टीम’ने तेथील सेंट जॉन चर्चमध्ये जाऊन चर्चच्या विश्‍वस्तांची भेट घेतली. चर्चच्या विश्‍वस्तांनी स्थानिक आमदार व्ही. डी. सतीशन यांच्याशी संपर्क साधून वैद्यकीय सेवेसाठी गेलेल्या “टीम’ला एक ऍम्बुलन्स, मदतनीस आणि भाषेची अडचण सोडविण्यासाठी अनुवादक दिले. डॉ. पाखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध ठिकाणाहून कोचीन जिल्ह्यातील परहुर या ठिकाणी स्थलांतरित केलेल्या पूरग्रस्तांना चार दिवस सगळ्या प्रकाराची वैद्यकीय सेवा पुरविली. पूरस्थिती काहीशी नियंत्रणात आल्याने 28 ऑगस्ट रोजी श्रीगोंद्याची टीम माघारी फिरली.

“केरळातील भीषण पूरस्थिती लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तीने मदतकार्यात सहभागी होण्याचे ठरविले. केरळला जाताना अनेकांनी औषधांची मदत केली. केरळातील पूरस्थिती भयानक होती. शेकडो कुटुंब बेघर झाले. अनेकांना जीव गमवावा लागला आहे. केरळातील पूरस्थिती नियंत्रणात आली आहे, मात्र आता तेथे साथीच्या आजारांचे प्रमाण खूपच वाढले आहे. अद्यापही तेथे वैद्यकीय सेवेची मोठी गरज आहे.
– डॉ. राजेश पाखरे, श्रीगोंदा फॅक्‍टरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)