केरळ – २८ वर्षीय रेडिओ जॉकीचा मृतदेह सापडल्याडी घटना केरळमध्ये उघडकीस आली आहे. केरळातील पहिली तृतीयपंथी रेडिओ जॉकी तसेच पहिली तृतीयपंथी विधानसभा निवडणूक तृतीयपंथी उमेदवार होती. बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अनन्या कुमारी असे या तृतीयपंथी रेडिओ जॉकीचे नाव आहे. अनन्याने लिंगबदल शस्रक्रियेनंतर आपली प्रकृती ठीक नसल्याची माहिती दिली होती. सर्जरीमध्ये चुकाझाल्यामुळे आरोग्याविषयक अडचणी जाणवत असल्याची माहिती तिने दिली होती.
अनन्याच्या मृत्यू आरोग्यासंबंधी तक्रारींमुळे मृत्यू झाल्याची पोलिसांना शंका आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे. मात्र अनन्याच्या मित्रांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे.