केरळ -“करोना’बाधित देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग दिल्लीसह देशातील सात विमानतळांवर सुरू असतांना केरळमध्ये कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे.
One positive case of Novel Coronavirus has been found, in Kerala. The student was studying at Wuhan University in China. The patient is stable and is being closely monitored. #coronavirus pic.twitter.com/fDlME0UdRR
— ANI (@ANI) January 30, 2020
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. हा विद्यार्थी चीनमधील हुआन विद्यापीठात शिक्षण घेत होता. तो चीनवरुन भारतात आला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून उपचार सुरु आहे. केरळमध्ये त्याच्यावर उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे.
यातच चीन येथे शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी भारत सरकारला भारत सरकारला आम्हाला अन्न मिळत नाही, पाणी मिळत नाही, आम्हाला वाचवा, येथून काहीही करून हलवा, अन्यथा अन्नासाठी बाहेर पाडावे लागेल,त्यात काय होईल ते सांगता येत नाही अशी आर्त हाक घातली आहे.