कोच्चि – केरळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी अर्थमंत्री के.एम. मणि यांचे मंगळवारी खाजगी रूग्णलयात निधन झाले आहे. ते 86 वर्षाचे होते. सांयकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Kerala Congress (M) chairman and former Kerala Finance Minister KM Mani passes away in Ernakulam. More details awaited pic.twitter.com/UynJU6j41o
— ANI (@ANI) April 9, 2019
गेल्या पाच दशकापासून ते केरळमधील पाला विधानसभा क्षेत्रातून आमदार होते. गेली चार दशकांपासून केरळच्या युतीच्या राजकारणात मणी प्रमुख नेते होते. त्यांनी राज्यात सहा मुख्यमंत्रीांसोबत काम केले होते. के.एम. मणि यांनी विविध सरकारमध्ये 24 वर्षे मंत्रीपद भूषविले. राज्य विधानसभेत त्यांनी 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला होता.