नवी दिल्ली -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या करोनाविषयक चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला. त्यामुळे त्यांना करोनाची बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले. केजरीवाल यांना तीन दिवसांपूर्वी ताप आला. त्याशिवाय, त्यांच्या घशात खवखव होत होती. त्यामुळे रविवारपासून केजरीवाल यांनी स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले.
त्यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. त्यानंतर मंगळवारी सकाळी केजरीवाल यांची करोनाविषयक चाचणी घेण्यात आली. सायंकाळी त्या चाचणीचा अहवाल आला. त्यातून केजरीवाल करोना संसर्गापासून दूर असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, केजरीवाल यांचा ताप ओसरला आहे. त्यांना आता बरे वाटत आहे. त्यामुळे ते लवकरच सरकारी कामकाजात सक्रिय होतील, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली.