दिल्लीतील शाळांसाठी केजरीवाल सरकारचे स्वतंत्र बोर्ड

नवी दिल्ली – दिल्लीतील 2700 शाळांसाठी केजरीवाल सरकारने स्वतंत्र शालेय शिक्षण बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली बोर्ड ऑफ स्कुल एज्येकेशन या नावाने हे बोर्ड कार्यरत राहील.सुरूवातीला 21-22 शाळा या बोर्डाच्या अखत्यारीत येतील आणि पुढील चार पाच वर्षात सर्व शाळा या बोर्डाच्या अखत्यारीत आणण्यात येतील अशी माहिती केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दिल्लीत आज सुमारे एक हजार सरकारी शाळा आणि 1700 खासगी शाळा आहेत. त्या आज सीबीएसई बोर्डाशी संलग्न आहेत. नवीन बोर्डाचे सीईओ म्हणून शिक्षण मंत्री काम करतील. त्यांचे हे पद पदसिद्ध असेल. चांगल्या दर्जाचे देशप्रेमी आणि निरपेक्ष भावनेने काम करणारे विद्यार्थी तयार करण्याचे काम या बोर्डाकडून केले जाईल असे ते म्हणाले. येथील शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्या पाठांतरापेक्षा विषयाची समज वाढवण्याकडे अधिक लक्ष दिले जाईल असे ते म्हणाले. आधुनिक तंत्राने आणि आंतरराष्ट्रीय दर्जाने या बोर्डाचे कामकाज चालेल असा दावाही केजरीवाल यांनी केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.