-->

सूरतमधील यशाने केजरीवाल उत्साहितच; 26 तारखेला करणार रोड शो

नवी दिल्ली – गुजरात महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्षाने दमदार एन्ट्री केली आहे. आपने पहिल्यांदाच गुजरातमधील महापालिका निवडणूक लढवली आहे. अशावेळी कॉंग्रेसला जोरदार झटका देत सूरत महापालिकेत आम आदमी पक्ष प्रमुख विरोधी पक्षाच्या रुपाने आकाराला आलाय. सूरतमधील पक्षाच्या प्रदर्शनावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर केजरीवाल 26 फेब्रुवारीला सूरतमध्ये रोड शो करतील आणि गुजरातच्या जनतेचे आभार व्यक्त करतील, असे पक्षाकडून सांगण्यात आले.

सूरत महापालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने एकूण 93 जागांवर विजय मिळवला आहे. तर कॉंग्रेसला मागे टाकत आम आदमी पार्टीने 27 जागांवर विजय संपादन केला आहे. महत्वाची बाब म्हणजे कॉंग्रेसला सूरतमध्ये भोपळाही फोडता आलेला नाही. गुजरातमधील राजकारणाची ही नवी सुरुवात असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

सूरत हा पाटीदार समाजाचा गड मानला जातो. गेल्या 25-30 वर्षात पाटीदार समाज हा भाजपच्या पाठीशी उभा राहिला आहे. मात्र या निवडणुकीत पाटीदार समाजातील मतदारांनीच आम आदमी पक्षाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. आम आदमी पार्टीचे गुजरात प्रमुख गोपाळ इटालिया हे सूरतमधील पाटीदार समाजातूनच येतात. त्याचा परिणामही या निवडणुकीत पाहायला मिळाला असे मानले जाते आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.