केजरीवाल यांच्यासह दिल्ली सरकारचे 5 मंत्री कोट्याधीश

नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारचा आज शपथ ग्रहण सोहळा पार पडला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर सहा आमदारांनी मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात केजरीवाल यांच्यासह 5 मंत्री कोट्याधीश तर 2 मंत्री लक्षाधीश आहेत.

मंत्रिमंडळात  कैलाश गहलोत यांच्याकडे सर्वाधिक संप्पती असून, गोपाळ राय यांच्याकडे सर्वात कमी संपत्ती आहे. कैलाश गहलोत नजफगढ़चे आमदार आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालानुसार गहलोत यांची 46.07 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती आहे.

संप्पतीच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकावर शकूर बस्तीचे आमदार सत्येंद्र जैन आहेत. त्यांच्याकडे 8.07 कोटींची मालमत्ता आहे. तर तिसर्‍या क्रमांकावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नंबर लागतो. त्याच्याकडे 3.44 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.

त्याचवेळी, सीमपुरी (राखीव) मतदार संघाचे आमदार राजेंद्र पाल गौतम यांनी 1.88 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केली आहे. बल्लीमारनचे आमदार इम्रान हुसेन यांच्याकडे 1.41 कोटींची संपत्ती मालमत्ता आहे. केजरीवाल सरकारमधील बाबरपूरचे आमदार गोपाल राय लखपती असून त्यांच्याकडे  90.01 लाख रुपयांची संपत्ती आहे, तर पटपड़गंजचे आमदार मनीष सिसोदिया 93 लाखाचे मालक आहेत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.