नगर (प्रतिनिधी) – शंभर वर्षाच्या कारकिर्दीत आयुर्वेदमधून हजारो विद्यार्थ्यांची वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून, समाजाची सेवा करत आहे. शेतकरी कुटुंबातील मुलांचं डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आयुर्वेदमहाविद्यालय करत आहे.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून समाजामध्ये काम करणे गरजेचे आहे. नगर शहरातील माणुसकीचा वारसा लाभलेला आहे. यापुढील पिढीने सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून माणुसकीचा ठेवा जोपासावा, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
आयुर्वेद गुणे महाविद्यालयाला क्रीडाई संस्थेच्यावतीने ईसीजी मशीन ची भेट आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी क्रीडाई संस्थेचे अध्यक्ष नितीन गुगळे, नरेंद्र बाफना, उपाध्यक्ष अमित मुथा, राहुल लुनीय, रसिक लुनिया, प्राचार्य डॉ. प्राणिला नलगे-दिवटे, डॉ. समीर होळकर, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, प्रशांत धलपे उपस्थित होते.
यावेळी बाफना म्हणाले, क्रीडा संस्थेच्या माध्यमातून वर्षभर सामाजिक बांधिलकी जोपासले आहे. आ. जगताप यांनी शहरामध्ये विकास कामाबरोबर सामाजिक बांधिलकीतून काम केले आहे. त्या करोना सारख्या महामारीच्या काळात पण जगताप यांनी अनेकांना धीर व आधार दिला सर्वसामान्य कुटुंबांना अन्नधान्य तसेच किराणा सारख्या गरजू वस्तूंचे वाटप करुन एक प्रकारे कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधीचे काम त्यांनी पूर्ण केले.