पुणे – नोव्हेंबर महिना सुरु होताच सर्वत्र थंडीची चाहूल लागली आहे. थंडीमध्ये शरीराच्या उष्णतेचा समतोल राखणे महत्त्वाचे असते. हिवाळ्यात भूक देखील फार वाढते.
तर,डायबिटीस असणाऱ्या लोकांना जास्त भूक लागते. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यासाठी काही खास पदार्थांचं सेवन करणं गरजेचं असतं, जे हिवाळ्यात देखील डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी मदत करतात.
दालचिनी – हिवाळ्यात दालचिनीचं सेवन ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. तसेच, दालचिनीचं जास्त प्रमाणात सेवन केल्याने जास्त भूक लागत नाही.
अंजीर – अंजीरचं सेवन डायबिटीस रूग्णांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. हिवाळ्यात अंजीरचं सेवन केल्याने डायबिटीजमध्ये इन्सुलिन तयार करण्यासाठी मदत करतात.
मेथीच्या बिया – हिवाळ्यात सकाळी कोमट पाण्यासोबत मेथीच्या बियांचे सेवन केल्याने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये राहते. त्यामुळे डायबिटीस रूग्णांसाठी मेथीच्या बिया आणि मेथीची भाजी अत्यंत फायदेशीर ठरतात.
काळी मिरी आणि आलं – थंडीत काळी मिरी व आल्याचं सेवन डायबिटीस रूग्णांसाठी अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे या दोन्ही पदार्थांचं सेवन केल्याने डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते.