केदारनाथ मंदिर परिसरात बर्फवृष्टीला सुरूवात

उत्तराखंड – चारधाम यात्रेतील केदारनाथ मंदिर गुरूवारपासून भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिराचा दरवाजा सहा महिन्यांनी उघडण्यात आला आहे. त्यानंतर आज शनिवारी केदारनाथ यात्रा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच या मंदिर परिसरात बर्फवृष्टीला सूरूवात झाली आहे. त्यामुळे यात्रेच्या मार्गावर बर्फाची चादर पडल्यासारखे दृश्य सर्वत्र दिसू लागले आहे. भाविकही या बर्फवृष्टीचा आनंद घेत आहेत.

दरम्यान, चार धाम मंदिरांची दारे ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये सहा महिन्यासाठी बंद केली जातात.उन्हाळ्यात उत्तराखंडमध्ये चार धामच्या (गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) यात्रेला सुरूवात होती. या चार स्थळाला हिंदू संस्कृतीत पवित्र मानले जाते. गंगा नदीचा उगम गंगोत्री आणि यमुना नदीचा उगम यमुनोत्री हे दोन्ही उत्तर काशी जिल्ह्यामध्ये आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)