पुणे – करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत नागरिकांना क्रिकेटपटू केदार जाधव याने पुन्हा मदतीचा हात पुढे केला आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रीकल्चरने (एमसीसीआयए) हाती घेतलेल्या योजनेला त्याने निधी दिला आहे.
करोनावर नियंत्रण यावे यासाठी प्रशासनाकडून सुरु असलेल्या योजनांना तसेच प्रयत्नांना एमसीसीआयएनेही सहकार्य केले आहे. त्यासाठी उभारण्यात येत असलेल्या निधीतून संरक्षक कपडे, मास्क आणि व्हेंटिलेटर्सचा आवश्यक पुरवठा रुग्णालयांना व तेथील कर्मचाऱ्यांना केला जाणार आहे. या कामी माझ्याकडून त्यांना मदत व्हावी या हेतूने मी निधी दिला, असे केदारने सांगितले.