पुणे : दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. परंतु मोठ्या पातळीवर रक्तदान शिबिरे आयोजित करुन रक्ताची उणीव भरुन काढली जाते. परंतु सध्या करोनामुळे राज्यासह देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिरे ठप्प झाली आहेत. याचा मोठा परिणाम रक्ताच्या उपलब्धतेवर दिसून येत आहे. त्यासोबतच करोनाची धास्ती घेतल्याने रक्तदात्यांनी रक्तदानाकडे पाठ फिरविली आहे. यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून लोकांनी गर्दी न करता रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्याक करोनाशी सुरू झालेल्या लढ्याला आता व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. करोनाग्रस्तांसाठी जगभरातून मदत यायला सुरुवात झाली असून त्यात जागतिक स्तरावरील क्रीडापटूही पुढे आले आहेत. याच दरम्यान, भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू केदार जाधव हा मृत्यूशी झुंजणा-या करोनाग्रस्तासाठी देवदूत ठरला आहे.
पुण्यात एक रूग्ण मृत्यूशी झुंज देत होता. त्याला अंत्यत रक्ताची गरज होती. हे कळताच केदार जाधव याने थेट पुण्याच्या रूग्णलयात जाऊन रक्तदान केले. याबाबत ब्लड सेवा परिवार यांनी ट्विट करत याबाबत माहिती देताना केदार जाधवचे याचे कौतूक केले आहे.
भारतीय क्रिकेट टीम के विस्फोटक बल्लेबाज @JadhavKedar जी ने इस संकट के समय में पुणे में एक बेहद जरूरतमंद इंसान के लिए रक्तदान कर मानवता की अद्भुत मिसाल पेश की है,@BloodsevaIndia परिवार आपके जज्बे को नमन करता है और आशा करता है आप दो मिनट का वीडियो संदेश रक्तदान पर हमें भेजें ।। pic.twitter.com/Eqa0Ehppam
— Blood Seva Parivar (@BloodsevaIndia) March 26, 2020
ब्लड सेवा परिवारने म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केदार जाधव याने अत्यंत संकटात असणा-या एका पुण्यातील रूग्णाला रक्तदान करत माणुसकीचे दर्शन घडवून दिले. ब्लड सेवा परिवार आपल्या कृत्याला नमन करत आहे. तसेच केदारप्रमाणे इतरांनी सुध्दा रक्तदान करावे असे ट्विट केले आहे.
दरम्यान , करोनामुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. केदार हा आयपीएलमध्ये चेन्नईचे प्रतिनिधीत्व करतो, संघाच्या सराव सत्रासाठी तो काही काळ चेन्नईत होता. पण हे सराव सत्रसुध्दा रद्द झाल्याने तो पुण्यात परतला आहे. केदार जाधवचा २६ मार्चला ३५ वा वाढदिवस देखील होता. त्याचदिवशी त्याने रक्तदान करून हे कृत्य केल्याने त्याचे नेटक-यांकडून कौतूक होत आहे.