मुंबई – बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन सध्या सोनी वाहिनीवरील ‘कौन बनेगा करोडपती’ च्या ११ व्या पर्वाचे सूत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये घडणाऱ्या अनेक गमती जमती त्यांचे किस्से ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनेक जण केबीसीमध्ये आपले स्वप्न साकार करण्यासाठी येतात. आतापर्यंत या सेटवर अनेकांनी हजेरी लावली असून पहिल्यांदाच या सेटवर एक मांजर आल्याचे पाहायला मिळाले. अमिताभ यांनी या मांजरीचा फोटो शेअर केला असून त्याला मजेशीर कॅप्शनही दिले आहे.
T 3534 – ???
ऐ बिलौरी , बिल्ली बिल्ली , खेलन चली KBC
जैसे आइ Fastest Finger, लोट पोट हो गयी वहीं ~ अब pic.twitter.com/3pq49UfSXR— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 30, 2019
दरम्यान, ही मांजर मंचावर दिसल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी तिचा फोटो काढून तो सोशल मीडियावर शेअर केला. सोबतच एक कविताही लिहीली आहे. ‘ऐ बिलौरी, बिल्ली बिल्ली, खेलन चली KBC,जैसे आइ Fastest Finger, लोट पोट हो गयी वहीं’, अस कॅप्शन त्यांनी या फोटोला दिल आहे. मांजरीच्या या फोटोला नेटिझिन्सनी चांगलच पसंत केल आहे. या सेटवर ही मांजर चुकून आली होती. मात्र या फोटोवर अनेकांनी मजेशीर कमेंटदेखील केल्या आहेत. ही मांजर ऑडिशनसाठी आली आहे का? असेही प्रश्न काहींनी विचारले आहेत.