पुणे : माजी पंतप्रधान श्रद्धेय भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त ‘काव्य अटल’ उपक्रमांतर्गत त्यांच्या ‘मेरी इक्यावन्न कवितांए’ हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांचे अभिवाचन आणि प्रदर्शन नुकतेच औंध येथे आयोजन करण्यात आले होते. माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
औंध येथील आयटीआय रस्त्यावर हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन औंध नगर सर संघचालक अविनाश भालेकर यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी माजी महापौर दत्ताजी गायकवाड, राष्ट्रीय सेविका समिती विद्यापीठ भाग कार्यवाहिका सुधा ताथोडे, जनसेवा बॅंकेचे अध्यक्ष सतीश गोरडे, राष्ट्रीय सेविका समिती पौरोहित्य विभाग प्रमुख लक्ष्मीताई पानट, संस्कार भारती विद्यापीठ विभाग प्रमुख आनंद तेलंग, पुणे मनपा स्विकृत सदस्य वसंतराव जुनवणे उपस्थित होते.
नरेश गुंड यांनी आपल्या भारदस्त आवाजात कवितांचे अभिवाचन केले. तर गणेश कलापुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि विश्लेषण केले. या कार्यक्रमाचे आयोजन सुप्रीम चोंधे, गणेश कलापुरे, रोहन कुंभार यांनी केले होते.