करुणानिधींची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

चेन्नई – तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि ‘डीएमके’चे पक्षप्रमुख एम.करुणानिधी यांना कावेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री अचानक त्यांची तब्येत खालावल्याने करुणानिधी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

करुणानिधी ९६ वर्षाचे असून ते मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. शुक्रवारी रात्री अचानक रक्तदाब कमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शिवाय करुणानिधी यांच्या देखरेखीसाठी एक विशेष डॉक्टरांचे पथक उपस्थित असल्याचेही कावेरी रुग्णालयाने प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, करुणानिधी यांना भेटण्यास द्रमुकचे कार्याध्यक्ष एमके स्टॅलिन, कनिमोझी, एमके अलगिरी, दयानिधी मारन, टीआर बाळू आदी नेते एम.करुणानिधी यांच्या रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर रुग्णालयाच्या बाहेर समर्थकांनी एकच गर्दी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)