कतरिनाची बहीण इसाबेला कैफचे बॉलीवूडमध्ये पदार्पण

कतरिना कैफची धाकटी बहीण इसाबेला बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी अगदी आतूर झाली आहे. आगामी “सुस्वागतम खुशामदीद’मध्ये ती दिसणार आहे. या आगामी सिनेमात तिच्यासमवेत पुलकित सम्राट देखील लीड रोलमध्ये दिसणार आहे. सामाजिक सौहार्द हा या सिनेमाचा मध्यवर्ती विषय असणार आहे. इसाबेला खूप कष्ट घेते, असे पुलकित सम्राटने सांगितले.

“सुस्वागतम खुशामदीद’ व्यतिरिक्‍त ती “टाईम टू डान्स’मध्येही ती दिसणार आहे. शीर्षकावरूनच या सिनेमाचा विषय डान्सशी संबंधित असणार याची कल्पना येते. “टाईम टू डान्स’ची घोषणा तीन वर्षांपूर्वी करण्यात आली होती.

मात्र वेगवेगळ्या कारणांनी सिनेमाला उशीर होत गेला. आता कुठे त्याच्या थिएटर रिलीजची डेट जाहीर करण्याची वेळ आली आहे. यामध्ये आदित्य पांचोली महत्वाचा रोल करणार आहे. लवकरच याची रिलीज डेट जाहीर केली जाईल. शुटिंग पूर्ण झाले असल्याने आता रिलीजची तारिख जाहीर होण्यास फार वेळ लागणार नाही.

इसाबेला स्वतः सोशल मिडीयावर खूप ऍक्‍टिव्ह आहे. त्यामुळे तिने स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करून स्वतःच्या पदार्पणाविषयी जोरदार हवा केली आहे. कतरिनाची बहिण म्हणण्यापेक्षा ही खुबसूरत हसिना बॉलीवूडमध्ये येत आहे, म्हणूनही तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.