सोशल मीडियावर कतरिनाचा तहलका

बॉलीवूड इंडस्ट्रीची “दिल की धडकन’ अर्थात कतरिना कैफ सोशल मीडियावर खूपच ऍक्‍टिव्ह असते. ती आपल्या अदांनी चाहत्यांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवित असते. कतरिनाने नुकताच एक खूपच मनमोहक असा फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती व्हाइट बिकिनीत समुद्र किनारी सुट्टीचा आनंद घेत असल्याचे दिसते.

कॅप्शनमध्ये कतरिनाने एक निळ्या रंगाची लहर आणि हार्ट इमोजी बनविली आहे. हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला असून त्याने सोशल मीडियावर तहलका केला आहे. कतरिना कैफला चित्रपटसृष्टीत 15 वर्षांहून अधिक काळ लोटला असून तिने करियरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिच्या फॅशन सेंसमुळे युवावर्गात तिची खूपच क्रेझ आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ती रोहित शेट्‌टीच्या “सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकणार आहे. हा चित्रपट मार्च महिन्यात रिलीज होणार होता. मात्र, अनिश्‍चित काळासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने हा चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे.

 

View this post on Instagram

 

🧡

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

यापूर्वी कतरिना कैफ “भारत’मध्ये सलमान खानसोबत झळकली होती. या चित्रपटात दिशा पाटणी, तब्बू, जॅकी श्रॉफ आणि सुनील ग्रोवर यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

The game of energy has changed ⚡#ZIGKinetica 🏃🏻‍♀️ #EnergyAmplified #SportTheUnexpected @reebokindia

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

Leave A Reply

Your email address will not be published.