कतरिनाच्या वाढदिवसाला यंदा पार्टी नाही

कतरिनाचा 36 वा वाढदिवस. पण ती यंदाच्या वाढदिवसाला कोणतीही पार्टी देणार नाही आहे. त्याऐवजी तिने आपला वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करायचे ठरवले आहे. वाढदिवसाच्या पार्टीच्या ऐवजी ती चक्‍क फिरायला जाणार आहे.

वाढदिवस हा आपल्या आयुष्यातील अगदी स्पेशल दिवस असतो. त्यामुळे हा स्पेशल दिवस अगदी स्पेशल व्यक्‍तींबरोबर साजरा करायचे कॅटने ठरवले आहे. कामातून सुट्टी घेऊन मित्र मैत्रिणी आणि बहिणीला बरोबर घेऊन लांबपर्यंत फिरायला जाण्याचे तिचे नियोजन आहे. आपला हा प्लॅन पब्लिकली ओपन करताना कतरिनाने बीचवरचा एक फोटोही शेअर केला आहे. अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा, श्‍वेता बच्चन, गुरू रंधवा, बादशाह आदींनी हा फोटो लाईक केला आणि कॅटला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. पण सलमानने तिला थोड्या उशिरानेच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने तिला दिलेल्या शुभेच्छांबरोबर एक फोटोही शेअर केला आहे. त्यात सलमान स्कूटर चालवतो आहे, तर कतरिना मागे बसली आहे. या फोटोतून सलमानने कतरिनाला लांबवर फिरायला घेऊन जायचा प्लॅन केल्याचे स्पष्ट होते.

 

View this post on Instagram

 

Thank u everyone so much for all the love and wishes …. And for making my day so special❤️💚💙💛🙏

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

अमिताभ बच्चन यांच्याबरोबर “बूम’मधून पदार्पण केलेल्या कतरिनाने आज बॉलिवूडच्या तिन्ही खान मंडळींबरोबर काम केले आहे. सलमानबरोबरच्या “भारत’मध्ये अलिकडेच ती लीड रोलमध्ये होती. आता अक्षय कुमारबरोबर “सूर्यवंशी’ मध्येही असणार आहे. स्वतः हिंदी बोलूही न शकणाऱ्या कतरिनाने हिंदीबरोबरच तेलगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमांमधूनही काम केले आहे. “गंधर्व’ची टीम आणि तिच्या फॅन्सकडून तिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)