कतरिनाने घेतली 65 लाखांची कार

कतरिनाने दुबईवरून परत आल्यावर आपल्या कारच्या ताफ्यामध्ये एक आलिशान रेंज रोव्हर घेतली आहे. तब्बल 50 ते 55 लाखांच्या या कारला नंबर मिळावा यासाही तिने त्या कारचे रजिस्ट्रेशनही केले आहे. ही कार सलमानकडून कतरिनाला गिफ्ट मिळाली आहे, असेही बोलले जाते आहे. सलमानने गेल्या काही दिवसात अश प्रकारच्या चार लक्‍झरी कार खेरेदी केल्या आहेत. त्यापैकी एक स्वतःसाठी, एक बहिण अर्पितासाठी, तिसरी भाऊ अरबाझसाठी आणि चौथी कतरिनासाठी आहे, असे समजते आहे. कतरिनाने या लक्‍झरी कारमधील सर्वोत्कृष्ठ मॉडेल निवडले आहे.

तिच्या कार कलेक्‍शनमध्ये ऑडीदेखील आहे. सलमान आणि कतरिना अलिकडेच दुबईला दबंग टुरसाठी गेले होते. मात्र तिथले वातावरण खराब असल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. सलमान आणि कतरिना दोघे दीर्घकाळ रिलेशनशीपमध्ये होते. आता जरी ते रिलेशनशीपमध्ये नसले तरी या कारच्या निमित्ताने दोघांची मैत्री अबाधित आहे, हे तरी स्पष्ट झाले. “झिरो’ झाल्यावर कतरिनाने सलमानबरोबरच्या “भारत’च्या शुटिंगवर लक्ष केंद्रीत केले आहे. यामध्ये सलमान 27 वर्षाच्या तरुणापासून 65 वर्षाच्या ज्येष्ठाच्या भूमिकेत दिसणार आहे. कोरियन फिल्म “ऍन ऑड टू माय फादर’चा रिमेक “भारत’ आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.