कतरिनाला बनायचेय ‘लेडी दबंग’

कतरिना सध्या “भारत’च्या यशाचा आनंद उपभोगते आहे. तिने आणि सलमानने अलीकडेच “भारत’च्या यशाचा आनंद माध्यमांसोबत साजरा केला. त्यावेळी कतरिनाने सर्वांसमक्ष सलमानला एक विनंती केली. तिला म्हणे सलमानप्रमाणे “दबंग’गिरी करायची आहे. चुलबुल पांडे प्रमाणेच लेडी पोलीस ऑफिसरच्या रोलमध्ये तिला गुंडांची धुलाई करायची आहे. त्यासाठी सलमानने तिला मदत करावी, अशी तिची अपेक्षा आहे.

ज्याप्रमाणे “दबंग’ची सिरीज एका पुरुष पोलीस ऑफिसरची कथा आहे. त्याचप्रमाणे फिमेल कॉपही असायला पाहिजे. अशा फिमेल कॉपचा सिनेमा जर करायचे ठरले, तर तो रोल आपल्याला मिळायला पाहिजे, अशी कॅटची इच्छा आहे. त्यावर आपल्या देशात नेहमीच हिरोच्या कथा चालतात. कतरिनाला फुल्ल ऍक्‍शन रोल मिळायला हवा, असे तिच्या चाहत्यांनाही वाटते आहे. आता लेडी कॉपच्या रोलचा विषय शिल्लक राहिला आहे. तर कॅटसाठी असा सिनेमा नक्कीच बनवला जाईल, असेही सल्लूने सांगितले.

खरे तर लेडी कॉपचा विषय बॉलिवूडला काही नवीन नाही. यापूर्वी विजयाशांती, रेखा, हेमामालिनी आणि प्रियांका चोप्रा यांनी लेडी कॉपचे रोल केले होते, पण ते रोल अगदी अपवादात्मक राहिले होते.

काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टीनेही “दबंग’, “सिंबा’ आणि “सिंघम’सारख्या कॉप फिल्मप्रमणे लेडी कॉपचा सिनेमा बनवण्यासठी तो उत्सुक असल्याचे सांगितले होते. मात्र, त्याने केलेले हे सूतोवाच कधी प्रत्यक्षात येणार हे माहिती नाही. अशी काही तयारी तो करत असल्याचेही समजलेले नाही. त्यामुळे कतरिनाला हा रोल कधी मिळेल हे नक्की संगता येणार नाही.

सलमान सध्या “दबंग 3’च्या तयारीमध्ये आहे. सोनाक्षी सिन्हा, अरबाझ खान, वरीना हुसैन आणि माही गिलसह अनेक कलाकारांची टीम त्याच्याबरोबर या सिनेमात असणार आहे. कदाचित आपल्या मैत्रिणीसाठी म्हणजे कतरिनासाठी तो “दबंग 4’मध्ये लेडी कॉपच्या रोलचे नियोजन करू शकेल.

Leave A Reply

Your email address will not be published.