कतरिना शिकली भांडी घासायला

करोना प्रादुर्भवामुळे कतरिना कैफने देखील घरात बसून एक मस्त उद्योग केला आहे. तिने चक्क भांडी घासण्याची प्रॅक्‍टिस केली आहे. एवढेच नव्हे तर तिने होम ऍप्रन बांधून चक्क आपल्या भांडी घासण्याचा एक व्हिडिओ बनवला आहे आणि आपल्या फॅन्सना त्याचे एक प्रात्यक्षिक दाखवले आहे. जे लोक भांडी कशी घासायची हे विसरले असतील, त्यांच्यासाठी हे एक ट्युटोरियल आहे, असे सांगून तिने भांडी घासण्याचा स्वतःचा व्हिडिओ शेअर केला आहे.

आपल्या स्वयंपाकघराच्या बेसिनमध्ये भरपूर भांडी जमा असलेले तिने दाखवले. त्यानंतर डिटर्जंट आणि वॉशिंग ब्रश घेऊन तिने या डिश घासून चक्क विसळल्या. कतरिना कैफच्या बरोबर कार्तिक आर्यननेही भांडी घासायचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे. त्याचाही व्हिडिओ त्याने अपलोड केला आहे, कार्तिक आर्यनची बहीण कृतिका तिवारीने कार्तिकच्या इन्स्टाग्रामवरील व्हिडिओला शेअर केले आणि त्याच्या कामाचे कौतुकही केले आहे.

कार्तिक आर्यनने आपल्या भांडी घासण्याच्या व्हिडिओबरोबर “कहानी घर घर की’ अशी कॅप्शन दिली आहे. आता वर्क फ्रॉम होम करणाऱ्या तमाम पब्लिकला घर बसल्याबसल्या अशी भांडीच घासायला लागली असतील, असा त्याचा थेट मेसेज होता.

Leave A Reply

Your email address will not be published.