बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ लॉकडाऊननंतर लवकरच ऍक्शन मोडमध्ये येणार आहे. ती आपल्या आगामी “टायगर-3′ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार अहे. यात तिच्यासोबत सलमान खान मुख्य नायक म्हणून काम करणार आहे. तो सध्या “राधे : योर मोस्ट वॉटेड भाई’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे शेड्यूल 8 महिन्यांचे असून तो अनेक देशांत शूट करण्यात येणार आहे.
टायगर सिरीजमधील या चित्रपटाच्या मागील दोन चित्रपट “एक था टायगर’ आणि “टायगर जिंदा है’मध्येही सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी झळकली होती. या जोडीला प्रेक्षकांनी खूपच पसंती दर्शविली होती.
सध्या सलमान खान आणि आदित्य चोप्रा यांच्यात चित्रपटासंबंधात चर्चा सुरू आहे. जर सर्वकाही नियोजनानुसार पार पडल्यास 2022 च्या ईदला टायगर फ्रॅंचाइजीचा हा तिसरा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल. दरम्यान, सलमानने 2012 मध्ये पहिल्यांदा यशराज फिल्म्ससोबत “एक था टायगर’मध्ये काम केले होते. या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धम्माल केली होती. त्यानंतर 2017 मध्ये टायगर सिरीजचा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला. यालाही प्रेक्षकांची उदंड प्रतिसाद दिला होता.