Katrina Kaif’s on Chhaava | अभिनेता विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. देशभरात या चित्रपटाला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटातील विकीने साकारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचे प्रेक्षकांकडून कौतुक केले जात आहे. विकी कौशलची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफने देखील त्याच्या कामाचे भरभरून कौतुक केले आहे. ‘अप्रतिम सिनेमॅटिक अनुभव होता’, अशा शब्दात कतरिनाने चित्रपट पाहिल्यानंतर तिच्या भावना व्यक्त केल्या.
रिलीजच्या आधीच छावा चित्रपटाच्या तिकिटाच्या अॅडव्हान्स बुकिंगने विक्रम केला होता. रिलीजच्या पहिल्या दिवशीच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यावधीची कमाई केली आहे. छावा चित्रपटाच्या प्रीमियरला विकी आणि कतरिना या दोघांनी हजेरी लावली होती. सिनेमा पाहिल्यानंतर कतरिनाने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नवऱ्याच्या कामाचे कौतुक करत कतरिनाने सोशल मीडियावर लिहिले की, अप्रतिम सिनेमॅटिक अनुभव होता… छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर जिवंत करण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर यांनी ही कथा खूप ताकदीने मांडली आहे. चित्रपट पाहून मी थक्क झाले… अखेरची ४० मिनिटं.. त्या क्षणी मी निःशब्द झाले.
View this post on Instagram
मी काल रात्री हा चित्रपट पाहिला आणि आज सकाळपासूनच तो पुन्हा पाहण्याची इच्छा होत आहे. या चित्रपटाने माझ्यावर इतका खोल परिणाम केला आहे की, ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, असेही ती म्हणाले.
विकी तुम्ही खरंच उत्कृष्ट आहेस, प्रत्येक वेळी जेव्हा तू पडद्यावर येतोस, तू पडद्यावर जिवंतपणा आणतोस. तू पात्रांमध्ये ज्या पद्धतीने सहज एकरूप होतोस, हे पाहून खूपच छान वाटतं. मला तुझा आणि तुझ्या प्रतिभेचा खूप अभिमान आहे, असे म्हणत तिने नवऱ्याचे तोंडभरून कौतुक केले. सोबतच, तिने संपूर्ण टीमचे देखील अभिनंदन केले.
दरम्यान, लक्ष्मण उतेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘छावा’ चित्रपटात विकी कौशलसोबतच अक्षय खन्ना, रश्मिका मंदाना या कलाकारांचीही प्रमुख भूमिका आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.