Entertainment News । कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अभिनेत्रीच्या टीमकडूनही मोठ वक्तव्य समोर आल आहे. नुकताच लंडनमधून एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये हे जोडपे कतरिना कैफ – विकी कौशल असल्याचे सांगितले जात आहे.
व्हिडिओमध्ये, रस्त्याने चालत असताना अभिनेता आपल्या पत्नीची काळजी घेतांना दिसत आहे. कतरिना ओव्हरकोटमध्ये दिसली होती आणि तिच्या चालण्यावरून लोकांनाही ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज लावला होता. व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने तर अभिनेत्रीला समोरून पाहिल्याचेही सांगितले होते. आता या बातम्यांदरम्यान अभिनेत्रीच्या टीमकडून अखेर एक स्पष्ट करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चा फक्त अफवा असून अभिनेत्री अद्याप प्रेग्नंट नसल्याचे कतरिनाच्या टीमने स्पष्ट केले आहे.
टीमने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘सर्व मीडिया हाऊसना विनंती आहे की त्यांनी हे अपुष्ट वार्तांकन आणि अटकळ थांबवावीत.’ म्हणजेच कतरिना अजून प्रेग्नंट नसून या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचं टीमने स्पष्ट केलं आहे.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचे लग्न डिसेंबर २०२१ मध्ये राजस्थानमधील उम्मेद भवन पॅलेसमध्ये झाले होते. अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची बातमी येण्याची ही पहिलीच वेळ नाही. यावेळी दीपिकाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्यांनंतर कतरिनाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र, तिचे चाहते या गुड न्यूजची आतुरतेने वाट पाहत आहे.