बोपदेव घाटात प्रवाशांचा खोळंबा

पीएमपी बस ब्रेकडाऊन

सासवड – कात्रज-सासवड या मार्गावर बोपदेव घाटात पीएमपीएमएलची बस क्र. 43 ही बस ब्रेकडाऊन झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या घाटात पर्यायी पीएमपीएमएलची बस येण्यासाठी सुमारे एक तास लागल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला होता.

पीएमपीएमएलच्या बस सतत ब्रेकडाऊन होत असल्याने प्रवाशांची गैरसोय होते. कात्रज बसस्थानकातून सासवडला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या बसस्थानकातून सासवडला बस सोडण्यात येतात. मात्र, या लांबपल्यांच्या मार्गावर सुस्थितीत बस सोडण्याची आवश्‍यकता आहे.

अनेकदा या मार्गावर खिळखिळ्या बस सोडल्या जात असल्याने बोपदेव घाटात बस बंद पडत असल्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे रात्री-अपरात्री बस बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here