कात्रज डेअरी ठरली राज्यात अव्वल

Madhuvan

कात्रज – लॉकडाऊनच्या काळात एकही दिवस डेअरी बंद न ठेवता ग्राहकांना सेवा दिलेल्या कामाची दखल घेत क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे स्टॅंडर्डने (वर्क प्लेस असेसमेंट फोर सेफ्टी अँड हायजिन) जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा विशेष प्रमाणपत्राद्वारे गौरव केला आहे.

करोना विषाणू संसर्ग काळात अर्थचक्र फिरते ठेवून करोना प्रसाराला आळा घालण्यासाठी भारतीय जनतेला खबरदारी कशी घ्यावी हे, सांगणारे नियमावली सर्टिफिकेट मिळवणारी कात्रज डेअरी ही भारतातील तिसरी व महाराष्ट्रातील पहिली ठरली आहे.

कात्रज डेअरीने अत्यावश्‍यक सेवेत खंड न पडू देता गुणवत्ता, पर्यावरण आणि सुरक्षिततेचे सारे नियम पाळत ग्राहकांना दूध व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा केला, याच कामाची दखल सदर संस्थेने घेतली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.