Accident News : कटिहार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ३१ वर भीषण रस्ते अपघात होऊन किमान १० जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (Accident News) मिळालेल्या माहितीनुसार, कोइरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दातपूर मुसाहरी चौकाजवळ बस आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, या अपघातात दोन दुचाकीही सापडल्या आणि त्यावरील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातग्रस्त बस हरदाहून पूर्णियाकडे जात होती. बस चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. बसने नियंत्रण गमावून पिकअपसह इतर वाहनांना धडक दिल्याचे सांगितले जात आहे. (Accident News) घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. कटिहार पोलीस यांच्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी गेदाबरहीजवळ हा अपघात घडला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे. (Accident News)