गुळुंचेत ‘काटेबारस’ यात्रा उत्साहात सुरू

श्री ज्योतिर्लिंग, ज्योतिबाच्या मूर्तींना नीरेत स्नान : आज मुख्य यात्रा

नीरा – गुळूंचे (ता. पुरंदर) येथील ज्योतिर्लिंगाची “काटेबारस’ यात्रा सुरू आहे. प्रथेप्रमाणे शनिवारी (दि. 9) बाराव्या दिवशी मुख्य यात्रा होणार आहे. आज कार्तिकी एकादशीला यात्रेनिमित्त श्री ज्योतिर्लिंगाच्या, तसेच ज्योतिबाच्या उत्सवमूर्तींना मानाच्या काठीसह शेकडो भाविकांनी भक्तिमय वातावरणात नीरा नदीत स्नान घातले.

मंदिरात दहा दिवसांपासून भजन, कीर्तन, बारा दिवस चालणारा छबिना, 12 दिवसांच्या उपवासाची सांगता उद्या काटेमोडवनाने होणार आहे. दीपावलीच्या प्रतिपदेला (पाडव्याला) स्वयंभू शिवलिंगाची पूजा केली गेली. गुरुवारी (दि. 7) रात्री गावात पालखीची सवाद्य नगरप्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी पालखी गावातील अर्ध्या भागातून फिरविण्यात आली. घरोघरी महिलांनी पालखीतील उत्सव मूर्तीची औक्षण करत पूजा केली.

नगरप्रदक्षिणेसह छबिन्याचा कार्यक्रम पहाटे 3 पर्यंत सुरू होता.शुक्रवारी सकाळी अभिषेक व आरती झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात पालखीसह मानाची काठी मंदिराबाहेर काढली. पालखी नीरा नदीकाठी दत्तघाटावर आणून उपस्थितांनी प्रथम मानाच्या काठीला तसेच ज्योतिर्लिंगाच्या व ज्योतिबाच्या उत्सवमूर्तींना मोठ्या श्रद्धेने नीरा नदीतील तीर्थाने जलाभिषेक केला. प्रत्येक शिवभक्ताला स्वहस्ते जलाभिषेकाचा मान आहे. दत्त महाआरती झाल्यावर गुळ-शेंगदाण्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. पालखीतील उत्सव मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. शनिवारी (दि. 9) मुख्य यात्रेदिवशी मंदिरात सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे.

श्री ज्योतिर्लिंग, ज्योतिबाच्या मूर्तींना नीरेत स्नान ः आज मुख्य यात्रा

प्रथेप्रमाणे शनिवारी (दि. 9) बाराव्या दिवशी मुख्य यात्रा होणार आहे. आज कार्तिकी एकादशीला यात्रेनिमित्त श्री ज्योतिर्लिंगाच्या, तसेच ज्योतिबाच्या उत्सवमूर्तींना मानाच्या काठीसह शेकडो भाविकांनी भक्तिमय वातावरणात नीरा नदीत स्नान घातले.

मंदिरात दहा दिवसांपासून भजन, कीर्तन, बारा दिवस चालणारा छबिना, 12 दिवसांच्या उपवासाची सांगता उद्या काटेमोडवनाने होणार आहे. दीपावलीच्या प्रतिपदेला (पाडव्याला) स्वयंभू शिवलिंगाची पूजा केली गेली. गुरुवारी (दि. 7) रात्री गावात पालखीची सवाद्य नगरप्रदक्षिणा घालण्यात आली. यावेळी पालखी गावातील अर्ध्या भागातून फिरविण्यात आली. घरोघरी महिलांनी पालखीतील उत्सव मूर्तीची औक्षण करत पूजा केली. नगरप्रदक्षिणेसह छबिन्याचा कार्यक्रम पहाटे 3 पर्यंत सुरू होता.शुक्रवारी सकाळी अभिषेक व आरती झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात पालखीसह मानाची काठी मंदिराबाहेर काढली.

पालखी नीरा नदीकाठी दत्तघाटावर आणून उपस्थितांनी प्रथम मानाच्या काठीला तसेच ज्योतिर्लिंगाच्या व ज्योतिबाच्या उत्सवमूर्तींना मोठ्या श्रद्धेने नीरा नदीतील तीर्थाने जलाभिषेक केला. प्रत्येक शिवभक्ताला स्वहस्ते जलाभिषेकाचा मान आहे. दत्त महाआरती झाल्यावर गुळ-शेंगदाण्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. पालखीतील उत्सव मूर्तींची मिरवणूक काढण्यात आली. शनिवारी (दि. 9) मुख्य यात्रेदिवशी मंदिरात सकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.