कॅट-विद्या एकत्र झळकणार

बॉलीवूडमध्ये मधल्या काळात नायिकाप्रधान चित्रपटांची लाट आली होती. पण हळूहळू ही लाट आता ओसरत गेल्याचे दिसत आहे. अर्थात हिंदी चित्रपटसृष्टीत अशा लाटा येतात आणि जातात. यातील काही प्रवाह टिकून राहतात. उदाहरणार्थ, त्रिकोणी प्रेमकथा, मल्टिस्टार फिल्म वगैरे. दोन नायिकांना घेऊन चित्रपट काढण्याचा निर्मात्या-दिग्दर्शकांचा छंद आजही कायम आहे. आता हेच पहा ना, कॅटरीना कैफ आणि विद्या बालन या बॉलीवूडच्या दोन चर्चित आणि यशस्वी अभिनेत्री प्रथमच एका चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.

हा चित्रपट ऍक्‍शन कॉमेडी असणार आहे. आनंद एल. राय यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिरुद्ध गणपती करणार आहेत. या चित्रपटाच्या पटकथेचे काम अंतिम टप्प्यात आहे. अलीकडेच “सूर्यवंशी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कॅटरिनाने आपल्या मनातील एक इच्छा प्रकट केली होती. त्यानुसार कॅटला महिला पोलीस अधिकाऱ्याची व्यक्‍तिरेखा साकायरची आहे. कदाचित, या आगामी नव्या चित्रपटातून तिला हा ड्रीम रोल साकारण्याची संधी मिळणार असावी !

 

View this post on Instagram

 

अबाउट लास्ट नाईट ?@manishmalhotra05

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

दुसरीकडे विद्या बालन सध्या शकुंतला देवींवर आधारित बायोपिकच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तिची या चित्रपटात कोणती भूमिका असेल याविषयीची कसलीच माहिती कळू शकलेली नाही. पण पहिल्यांदाच या दोन अभिनेत्री रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.