काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्याण्बा युवासेनेतून काढले : आदित्य ठाकरेंची कारवाई

मुंबई – काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मरहाण करणाऱ्यांमध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संघटनेतून काढून टाकले आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्‍वभुमीवर यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही काश्‍मिरी विद्यार्थांना मारहाण झाली होती. त्याची दखल घेऊन आदित्य ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.

मारहाण झालेले हे विद्यार्थी यवतमाळमधील दयाभाई पटेल फिजीकल एज्युकेशन कॉलेजमध्ये शिकत आहेत. बुधवारी रात्री युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली होती.

“काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना संघटनेतून काढून टाकण्यात आले आहे. जम्मू काश्‍मीर हा भारताचा भाग आहे. त्यामुळे दहशतवादाबाबत जबाबदार धरून कोणाही भारतीयाला रोषाला सामोरे जायला लागता कामा नये. दहशतवादाविरोधातील संताप समजला जाऊ शकतो. मात्र तो कोणाही निरपराधांविरोधात व्यक्‍त होता कामा नये.’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

एका विद्यार्थ्याला “वंदेमातरम’ म्हणण्यास सांगितले गेले. त्यानंतर त्याला शिवीगाळ करून मारहाण केली गेली होती. या मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यावर या प्रकरणी पोलिसांनी प्रकरण दाखल करून घेतले होते. ही घटना निषेधार्ह असून मारहाण करणारे युवा सेनेचे कार्यकर्ते असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे युवासेनेचे चिटणीस वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.