यवतमाळमध्ये काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

यवतमाळ – शिक्षणासाठी जम्मू-काश्‍मीर येथून आलेल्या विद्यार्थ्यांना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार यवतमाळमध्ये घडला आहे. ही घटना यवतमाळच्या वैभवनगर परिसरात घडली. “काश्‍मीरला परत जा’ असे म्हणत युवासेनेच्या 10 ते 12 कार्यकर्त्यांनी 3 ते 4 काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण केली.

या कार्यकर्त्यांनी मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला आहे. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांनी लोहारा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान, पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात ठिकठिकाणी काश्‍मिरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.