काश्‍मीरी विभाजनवाद्यांना विदेशातून आर्थिक मदत

एनआयएच्या चौकशीमध्ये आंद्रबी आणि शबीर शाह विरोधात पुरावे उघड

नवी दिल्ली- कश्‍मीरमधील विभाजनवाद्यांना विदेशातून अर्थसहाय्य होत असल्याचा आरोप राष्ट्रीय तपास संस्था अर्थात “एनआयए’ने केला आहे. कट्टर विभाजनवाद्यांच्या मुलांच्या विदेशातील शिक्षणासाठी आणि वैयक्तिक लाभासठी ही आर्थिक मद्‌त दिली जात असल्याचे “एनआयए’ने म्हटले आहे.

“एनआयए’ने हुर्रियत कॉन्फरन्स आणि अन्य विभाजनवादी संघटनांच्या वरिष्ठ नेत्यांची अलिकडेच चौकशी केली. त्यादरम्यान काश्‍मीर खोऱ्यातील नागरिकांच्या भावना भडकावण्यासाठी आपल्याला पाकिस्तानातून आर्थिक मदत मिळत असल्याचे या विभाजनवाद्यांनी कबूल केले आहे. कट्टर विभाजनवादी संघटन दुख्तर ए मिलातच्य फायरब्रॅन्ड नेत्या असिय आंद्रबी यांचीही “एनआयए’ने चौउकशी केली. त्यांचा मुलाला मलेशियात शिक्षणासाठीचा पैसा झहूर वातालीकडून मिळाल्याचे त्यांनी मान्य केले. वताली याला “टेरर फंडिंग’ प्रकरणी अटक करण्यात आली होती.

याशिवाय विदेशतील काही स्रोतांमधून दुख्तरन ए मिलातला देणग्या मिळाल्याचेही आंद्रबी यांनी मान्य केले. दुख्तरन ए मिलात ही संघटना काश्‍मीर खोऱ्यातील मुस्लिम महिलांच्यावतीने आंदोलन करत असते. आंद्रबी यांचा मुलगा मोहम्मद बिन कासीम विद्यापिठामध्ये शिकत असल्यापासून वापरात असलेल्या बॅंक खात्यांचा तपशीलही “एनआयए’ने मागवला आहे.

आणखी एक विभाजवादी शबीर शाह याच्या उद्योगाबाबतही “एनआयए’ने कसून चौकशी केली. पाकिस्तानातील एजंट आणि जम्मू काश्‍मीरमधील हुर्रियतशी संबंधित पाकमधील”ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्स’च्या प्रतिनिधींकडून पैसे हस्तांतरित केले जात असल्याचे पुरावेच त्याने दिले. विविध हॉटेल अणि पहलगाममधील उद्योगातील गुंतवणूकीबाबत त्याच्याकडे कसून चौकशी केली गेली होती.

“एनआयए’ने 2017 मध्ये जमात उद दावा, दुख्तरन ए मिलत, लष्कर ए तोयब, हिज्बुल मुजहिदीन अणि अन्य विभाज्नवादी नेत्यांविरोधात प्रकरण दाखल केले होते. दहशतवाद्यांना होणारे अर्थसहाय्य, दहशतवादी कारवाया, काश्‍मीर खोऱ्यात अस्थिरता निर्माण करणे आणि देशाविरोधात युद्ध पुकारण्याबाबतचे आरोप “एनआयए’ने ठेवले आहेत. “एनआयए’ने आतापर्यंत जमात उद दावाचा म्होरक्‍या हाफिझ सईद, हिज्बुबुल मुजाहिदीनचा म्होरक्‍या सय्यद सलाहुद्दीन, 7 विभाजनवादी नेते, 2 हवाला मध्यस्थ आणि दगडफेक करणारे काही जण अशा एकूण 13 आरोपींच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)