काश्‍मिरची स्थिती चिंताजनक :आझाद

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या पाच ऑगस्टच्या निर्णयामुळे जम्मू आणि काश्‍मीरची स्थिती चिंताजनक बनली असून अर्थव्यवस्थअ डबघाईला आली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.

काश्‍मिरची आठवडाभर पाहणी करून श्री. आझाद सोमवारी परतले.त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, जम्मू आणि काश्‍मिर दोन्ही गेले दोन महिने बंद आहे. त्यामुळे राज्याची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. काश्‍मिरात लागणाऱ्या सर्व गोष्टी जम्मूतून जातात. मात्र, बंदमुळे जम्मूतील व्यवसाय शुन्य आहे. जम्मू आणि काश्‍मिर दोन्ही ठिकाणी अस्वस्थता आहे. सत्ताधारी पक्षाचे ाथानिक नेते राष्ट्रीय नेत्यांच्या भीतीमुळे बोलत नाहीत.

काश्‍मिरातील बहुसंक्‍य नेत्यांना एक तर अटक केली आहे, किंवा घारत नजरकैदेत तरी ठेवले आहे. अशा अवस्थेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्या रद्द कराव्यात आणि सर्व नेत्यांची सुटका करावी असेही या काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.