काश्‍मीरप्रश्‍नी ट्रम्प यांना मध्यस्थीची विनंती नाहीच; परराष्ट्रमंत्र्यांचे स्पष्टीकरण  

नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान दरम्यान काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र अशा प्रकारे मध्यस्थी करण्याबाबत आपल्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सुचवले असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी सांगितले. परंतु, काश्मीरप्रश्नी  ट्रम्प यांना मध्यस्थी करण्याची कोणतीही विनंती मोदी यांनी केली नव्हती, असे स्पष्टीकरण परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संसदेत दिले.

जयशंकर म्हणाले कि, नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याची कोणतीही विनंती केली नाही. पाकिस्तानबरोबरील जे काही मुद्दे आहेत, ते सर्व दि्वपक्षीय स्तरावर सोडवले जावेत यावर ते ठाम आहेत. शिमला करार आणि लाहोर घोषणेनुसार भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा कोणताही प्रश्न दि्वपक्षीय स्तरावरच सोडवला जाईल, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काश्मीरप्रश्नी मध्यस्थी करण्याबाबत ट्रम्प यांचा दावा  परराष्ट्र मंत्रालयाकडून सोमवारीच फेटाळण्यात आला होता. तरीही याचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहात उमटले. काँग्रेससह विरोधी पक्षांनी याप्रकरणी पंतप्रधान मोदींनी स्वतः खुलासा करण्याची मागणी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.