पुणे – कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजता सुरु झाली. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर पहिल्या पाच फेऱ्यांमध्ये आघाडीवर आहेत. तर हेमंत रासणे हे पिछाडीवर आहेत. रासने विरुद्ध धंगेकर अशी कांटे की टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पाचव्या फेरीमध्ये धंगेकर यांनी तब्बल तीन हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
पाचव्या फेरीपर्यंत धंगेकर यांना १९ हजार २० मत मिळाली आहेत तर हेमंत रासने यांना १७ हजार मते मिळाली आहेत. दोन्हही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी 16 उमेदवार आहे. त्यानुसार पहिल्या फेरीचा निकाल सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास हाती आला. तर दुपारी निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. कसबा पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि.26) मतदान झाले. यामध्ये 50 टक्के इतके मतदान झाले होते.