पुणे : भाजपमध्ये कसबा विधानसभा मतदारसंघात सध्या जी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे ती काँग्रेसच्या पथ्यावरच पडली असून काँग्रेसचा तेथील विजय अधिक सोपा झाला असल्याचा दावा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी केले. कसबा विधानसभा मतदारसंघा बाबत जोशी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात हा दावा करण्यात आला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या एका निवेदनात मोहन जोशी यांनी म्हटले आहे की कसबा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला जात असला तरी मागील २५ -३० वर्षे या मतदारसंघात भाजपचा प्रतिनिधी असतानाही मतदारसंघातील नागरिक मुलभूत सोयी सुविधांपासून उपेक्षीत आहेत. त्यामुळे काॅग्रेसच्या उमेदवाराला मतदारांनी पोटनिवडणूकीत संधी दिली. तर केवळ सोळा महिन्यांसाठी रवींद्र धंगेकर यांनी येथून आमदारकीची संधी मिळाल्यानंतर या मतदारसंघात कसे काम होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिले.
धंगेकर यांना पूर्ण पाच वर्षासाठी निवडून दिले तर त्याचा आपल्या मतदारसंघातील सर्वांनाच लाभ होईल याची जाणीव येथील सर्वच घटकातील लोकांना झाली आहे. त्यामुळे धंगेकर पोटनिवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्याने धंगेकर यांना यंदा निवडून येणार आहेत असा दावाही जोशी यांनी या निवेदनात केला आहे.
दरम्यान ,आज सकाळी रवींद्र धंगेकर यांनी कसबा गणपती, पासोड्या विठोबा, सिटी पोस्ट, दगडी नागोबा, डुल्या मारुती, दूध भट्टी आदि भागातून पदयात्रा काढली यावेळी रोहित टिळक, जयसिंग भोसले, विशाल धनवडे, राजेंद्र शिंदे, शिवराज भोकरे, संतोष भुतकर, संदीप आटपाळकर, प्रवीण करपे , गौरव बोराडे , सुरेश कांबळे, गणेश नलावडे, दीपक जगताप सहभागी झाले होते.