पुणे – लाडक्या बहिणींना छेडणाऱ्या रोडरोमियो व विकृत मानसिकतेला ठेचणाऱ्या मनसैनिक गणेश भोकरे यांना कसबा मतदारसंघात सुरुवातीपासूनच वाढता पाठिंबा आहे. महिलांचा सन्मान आणि सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या गणेश भोकरे यांना मतदारसंघातील माता- भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आमच्या भावाला विधानसभेत पाठविण्याचा निश्चय केल्याचे सांगितले.
कसबा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार गणेश भोकरे यांनी प्रचारात आघाडी घेत, लढत चुरशीची केली आहे. जनसामान्यांच्या न्यायासाठी, महिलांच्या हक्कासाठी, तरुणांच्या रोजगारासाठी आणि ज्येष्ठांच्या सेवेसाठी राबणारा हा कार्यकर्ता कसब्यातील घराघरांत पोहोचत आहे. आजवर केलेले काम, भविष्यात कसबाचा लौकिक परत मिळवण्यासाठीच्या योजना मांडत आहे.
गणेश भोकरे म्हणाले, या माता-भगिनींची सुरक्षा, त्यांचा सन्मान याला माझी प्राथमिकता आहे. कसब्यातील माझ्या या सर्व बहिणी पाठीशी असल्याने माझा हुरूप वाढला आहे. गेल्या पंधरा दिवसांत आईच्या मायेने, बहिणीच्या प्रेमाने मिळालेला प्रतिसाद मला निश्चितपणे ऊर्जा देणारा ठरला आहे. उद्याच्या निवडणुकीत तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावर विजय मिळवून कसब्याचे प्रतिनिधित्व विधानमंडळात करण्याचा मला विश्वास आहे.