शेअरबाजारांकडून कार्विचे सदस्यत्व रद्द

मुंबई – राष्ट्रीय शेअरबाजाराबरोबरच मुंबई शेअरबाजाराने कार्वि स्टॉक ब्रोकिंगचे सदस्यत्व कंपनीच्या दिवाळखोरीमुळे रद्द केले आहे. आता कार्वि स्टॉक ब्रोकिंगकडून ज्या गुंतवणूकदारांची येणी आहेत ती शेअरबाजारांच्या गुंतवणूकदार संरक्षण निधीमधून चुकती करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

गुंतवणूकदारांची परवानगी न घेता कार्विने गुंतवणूकदारांचे शेअर स्वतःच्या डिमॅट अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले असल्याचा आरोप आहे. बाजार नियंत्रक सेबीनेही कार्विवर कारवाई केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.