करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण

शारदीय नवरात्रोत्सव ;बुधवारी गाभारा दर्शन बंद

कोल्हापूर: शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात जय्यत तयारी सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून उत्सवकाळात देवीला परीधान करण्यात येणा-या दागिन्याची स्वछता आणि पॉलिश करून दागिने तयार करण्यात आले आहेत.

कोल्हापुरच्या श्रीअंबाबाईला देवीला नित्यविधीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांची आज स्वच्छता करण्यात आली आहे. या मध्ये प्रमुख्याने देवीला मडवण्यात येणा-या सोन्याच्या दागिन्यां मध्ये कोल्हापुरी साज, मोहनमाळ, 2 वाळे , 2 कुडले , किरीट, पिंपळपान , 2 सातपदरी कंठी , जोंधळेपोत, चंद्रहार, लप्पा ,1 कोल्हापुरी जडावाचा साज, मोत्यांची माळ, चिंतामणी, दोन पदरी कंठी, चिंचपेटी, 2 मोतीहार , जडावाचा चारपदरी साज, सोन्याची तनपटी , चिंचपेटी, कंठी , या दागिन्यांनी नवरात्रौत्सवात देवीला मडवन्यात येतंय . तसच चांदीची प्रभावळ, पालखी, पालखींचे तोंड, दांडा, चौर्‍या मूर्ती, अभिषेकाची भांडी अशा विविध दागिन्यांची आणि देवीचे नित्यालंकार यासह खास नवरात्रात घातले जाणारे अलंकार यांची आज मंदीर परीसरात स्वच्छता केली.

उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी मोठ्ठा पोलिस बंदोबस्त आणि 60 हून अधिक CCTV ची नजर असणार आहे. दरम्यान महापुराचा कोणताही फटका यंदा उत्सवकाळा दरम्यान बसणार नसून गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्तीत जास्त भाविक दर्शनाचा लाभ घेतील.

 गाभारा दर्शन बंद

बुधवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी अंबाबाई मंदिरातील मुख्य गाभाराची स्वच्छता करण्यात येणार असल्यानं गाभारा दर्शन भाविकांसाठी बंद करण्यात आल आहे. बुधवारी सकाळ पासून सायंकाळी सात वाजे पर्यंत दर्शन बंद राहील. गाभारा दर्शन बंद असताना दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उत्सव मूर्ती चे दर्शन घेण्याची व्यवस्था देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.